0:00 नमस्कार सध्याच्या जीवनशैलीमध्ये पचनशक्ती बिघडण्याचे प्रमाण खूप वाढत चाललंय आयुर्वेदानुसार पचनशक्ती म्हणजे शरीरातला अग्नी खूप खूप महत्त्वाचा आहे अग्नी म्हणजे केवळ अन्नाचे पचन नाही तर शरीरात आलेल्या कुठल्याही आहाराचं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रूपांतरण करण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप महत्त्वाची आहे आयुर्वेदानुसार अग्नी हा जीवनाचा गाभा आहे जेव्हा अग्निमा होतं तेव्हा असंख्य रोग होतात कारण शरीरातील ट्रान्सफॉर्मेशनची प्रक्रिया बिघडलेली असते जो आहार घेतला जातो त्याचे रूपांतर योग्य शरीर घटकात होऊ शकत नाही त्यामुळे सेल्युलर लेव्हल वर वेगवेगळे दोष जमा होतात आणि मग या दोषांचा अडथळा निर्माण होतो त्यामुळे असंख्य विकार होतात स्वस्थ निरोगी दीर्घायु राहण्यासाठी
0:45 अग्नी नेहमी उत्तम असणे खूप महत्त्वाचे आहे का बिघडते पचनशक्ती त्याची महत्त्वाची पाच कारण कोणती पचनशक्ती बिघडते म्हणजे काय होतं त्याची महत्त्वाची पाच लक्षणं कोणती आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी ती वाढवण्यासाठी खात्रीचे पाच उपाय कोणते हे सगळं आपण पाहणार आहोत आपल्या youtube व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अरहम आयुर्वेद youtube चॅनेल मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आज तुमच्यासाठी एक नवीन अनाउन्समेंट ती म्हणजे आपलं अरहम पॉडकास्ट हे नवीन चॅनेल सुरू केलेले आहे या चॅनेल वर वेगवेगळ्या विषयांवरची शास्त्रीय व्याख्यान मुलाखती तुम्हाला ऐकता येतील अरहम आयुर्वेद या चॅनलला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहेच तसाच अरहम कास्ट याही चॅनलला द्याल असा विश्वास वाटतो मग
1:33 डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर जाऊन अरहम पॉडकास्ट हे चॅनेल अवश्य अवश्य सबस्क्राईब करा वळूया आपल्या विषयाकडे नेमकं पचनशक्ती बिघडते तेव्हा दिसणारी महत्त्वाची पाच लक्षणं कोणती हे सगळ्यात आधी पाहूया पहिलं म्हणजे मलावरोध पचनशक्ती योग्य असली आणि पचन व्यवस्थित झालं तर शरीरात आवश्यक आणि अनावश्यक अशा घटकांची विभागणी योग्य होते शरीराला उपयुक्त असतो भागातून शरीर घटक बनतात आणि टाकाऊ भाग बाहेर टाकला जातो जेव्हा मलशुद्धी होत नाही तेव्हा हे विभाजन असतं तेच बिघडलेलं असतं दिवसातून एक किंवा दोन वेळा नैसर्गिक मलशुद्धी होणं फार वेळ न लागणं हे आरोग्याचं महत्त्वाचं लक्षण आहे पचनशक्ती बिघडल्याचं दुसरं लक्षण आहे
2:19 अपचन प्रत्येकानं आपलं जेवण पचतंय की नाही हे लक्ष देऊन पाहिलं तर शरीर स्वतः स्वतःला व्यवस्थित संदेश देत असतं हे पचन झालेलं नसेल तर पोट जड वाटतं मळमळ होणे डोकेदुखी अनुत्साह असे वेगवेगळे प्रकार होतात तिसरे लक्षण आहे पोट फुगणे किंवा वारंवार गॅसेस होणे चौथं लक्षण आहे आम्लपित्त तोंडात आंबट पाणी येणे घशात पोटात छातीत जळजळणे मळमळणे दिवसातून तीन ते चार वेळा म्हणजे वारंवार परसाकडे जावं लागणे याचा अर्थ शरीरात अनावश्यक दोष जमा झालेत आणि शरीर ते बाहेर टाकायचा प्रयत्न करतोय असा याचा अर्थ त्यालाच बरेच जण समजतात असतात ऍसिडिटी आणि मग ऍसिडिटी झाली की लोक काय करतात पटकन सोडा घे इनो घे
3:05 किंवा मेडिकल मध्ये जाऊन एखादा अँटीसिड घे पण समस्येच्या मुळाशी जाऊन विचारच केला जात नाही पाचवं लक्षण आहे पचनशक्ती बिघडल्याचं ते म्हणजे कुठलाही एकच आजार किंवा लक्षण नाही तर अनेक मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जेव्हा दीर्घकाळ पचनशक्ती बिघडलेली असते त्यामुळे होणारे आजार कोणते तर वाढलेलं वजन आहे कोलेस्ट्रॉल बीपी शुगर हृदयरोग त्वचा विकार केसांच्या श्वसनाच्या समस्या सतत होणारे मूड स्विंग्स हे सगळं पचनशक्ती बिघडल्यामुळे होऊ शकतं तर ही महत्त्वाची पाच लक्षणं आहेत ज्यामुळे तुम्हाला कळेल की अग्नी किंवा पचनशक्तीमध्ये काहीतरी गडबड आहे पचनशक्ती मंद होते तेव्हा भूक कमी होते खाण्याची इच्छा होत नाही पोट साफ होत नाही त्यासाठी पेशंट वेगवेगळे उपाय मनानं करत राहतात पोट
3:50 साफ होण्यासाठी काही चूर्ण घेतात गोळ्या घेतात किंवा अँटॅसिड सोडा इनो असं काही घेतात पण बरेचदा या चूर्णांमध्ये जी चूर्ण इन्स्टंट रिझल्ट देतात एका रात्री पोट साफ असा दावा करतात त्या चूर्णांमध्ये बरेचदा मोठ्या मात्रेत मीठ किंवा सोडा असतो मीठ किंवा सोडा असलेल्या या गोष्टींची सवय लागते म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला अर्धा चमचा चूर्ण घेतलं तर बरं वाटेल आठ दहा दिवसांनी एक चमचा घ्यावा लागेल महिन्याभराने दोन चमचे घ्यावे लागतील असा याचा डोस वाढत जातो आणि ज्या दिवशी तुम्ही यापैकी काही औषध घेणार नाही त्या दिवशी गाडी पुन्हा पूर्व पदावर येते आणि मीठ किंवा सोड्याचे दुष्परिणाम होतात ते वेगळेच याला आयुर्वेदात म्हटले वेग उदीर म्हणजे शरीराच्या ज्या नैसर्गिक संवेदना आहेत ना त्यांना आयुर्वेदात वेग असं नाव आहे या वेगांचे जबरदस्तीने धारण करू नये
4:37 म्हणजे रोखून ठेवू नये त्याचप्रमाणे जबरदस्तीने उदीण म्हणजे प्रवर्तन करू नये असा आयुर्वेदाचा साधा सोपा आणि मूलभूत नियम आहे जेव्हा मलशुद्धी नैसर्गिक रित्या किंवा शरीराची नैसर्गिक पचनशक्ती असते त्यामुळे होतच नाही तेव्हा वेगवेगळ्या औषधांमुळे जबरदस्तीने मलशुद्धी करणे हे वेग उधिरण आहे बरेच दिवस असं केल्यामुळे पचनशक्ती आणखी कमजोर होते इंटेस्टीनल पेरिस्टासिस म्हणजे आतड्यांची जी नैसर्गिक मुव्हमेंट आहे पुढे सरकण्याची क्रिया आहे ती आणखी मंदावते आतड्यांची इलास्टिसिटी फ्लेक्सिबिलिटी कमी होते धारण शक्ती कमी होते आणि समस्या आणखी वाढतात आता पचनशक्ती मंदावण्याची आयुर्वेदानुसारची पाच शास्त्रीय कारण
5:22 कोणती ते आपण पाहणार आहोत बोली भाषेत आपण म्हणतो ना एखाद्याला सोन्याचा घास खाल्ला तरी अंगी लागत नाही आणि एखादा असतो चटणी भाकर खाल्ली तरी ठणठणीत याचं कारण आहे पचनशक्ती तुम्ही काय खाताय याचा इतकाच याच्याबरोबरच इतकं महत्त्वाचं आहे की शरीरात त्याचं पचन किंवा शोषण कसं होते हे जे पचन आहे ते बिघडण्याचं पहिलं कारण आहे अध्यक्ष म्हणजे काय अधिक प्रमाणात घेतलेला आहार मग हे प्रमाण क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही दृष्टीने तपासायला हवं तुमची भूक केवढी आहे त्यापेक्षा अधिक मात्रेत घेतलेला आहार हाही चूक आणि तुमची पचनशक्ती आहे त्यापेक्षा जड असलेला पचायला वेळ लागलेला आहार घेणे हेही चूक दुसरं कारण आहे विषमासन म्हणजे पचन शक्तीसाठी अयोग्य
6:10 असा आहार त्याचं सगळ्यात प्रचलित उदाहरण म्हणजे जंक फूड त्यामुळे न पोट भरत न पोषण होतं पॅकेट मधलं कुठलंही रेडीमेड फूड याच कॅटेगरीत येते आणि विषमासन म्हणजे कोणत्याही कुठलाही पदार्थ खाणं किंवा रोज वेगवेगळ्या वेळी जेवण करणं रात्री वेळी अवेळी खाणं हे सध्या फारच वाढतं त्यामुळे अग्नीची जी लय असते ती बिघडून जाते कुठल्याही वेळी काहीही खाल्लं तर पचनशक्ती बिघडणार हे शंभर टक्के तिसरं कारण आहे भूक नसताना घेतलेला आहार म्हणजे पूर्वीचा आहार जीर्ण झाला नाही पचला नाही त्यापूर्वी घेतलेलं पुढचं जेवण किंवा फक्त वेळ झाली किंवा आवड आहे म्हणून खात राहणं हे पचनशक्ती बिघडण्याचे महत्त्वाचं कारण आहे चौथं कारण आहे
6:56 व्यायामाचा अभाव सगळ्यांचा बैठका पण निसर्गातला कुठलाही प्राणी मात्र इतके तास एका ठिकाणी बसण्यासाठी निसर्गाने बनवलेलाच नाही निसर्गाच्या या रचनेमध्ये आपण दिवसभर बसून व्यक्त आणतोय त्यामुळे नैसर्गिक अशा ज्या संवेदना आहेत ना भूक लागणं तहान लागणं झोप येणं किंवा पोट साफ होणं त्या सुद्धा वेळेवर किंवा व्यवस्थित होत नाहीत आणि पाचवं कारण आहे पचनशक्ती बिघडण्यामागचं ते आहे मानसिक चिंता शोक भय क्रोध यामुळे जीवनशैली कितीही निरोगी असली तरी या कारणांमुळे पचनशक्ती मंदावते जेव्हा आपल्याला खूप काळजी वाटते खूप भीती वाटते किंवा खूप राग येतो अशा वेळी जेवण जात नाही याचा अनुभव सगळ्यांनीच घेतलेला आहे किंवा अशा वेळी जेवण केलंच तर त्याचा त्रास होतो ते पचत नाही या संदर्भात खूप
7:44 संशोधन होत आहेत आणि माइंड गट कनेक्शन हे फार सुंदर पुस्तक या विषयावर आहे ज्यामध्ये पचनशक्ती आणि मानसिक स्थिती एकमेकांवर कशी अवलंबून आहे याचं फार सुंदर पुराव्यांसहित संशोधन आणि त्याचं वर्णन केलेलं आहे तर हे झाली पाच लक्षणं आणि पाच कारण ज्यामुळे पचनशक्ती बिघडते आता वळूया उपायांकडे यासाठीचे पाच प्रमुख उपाय पाहूया अर्थात पहिला उपाय म्हणजे निदान परिवर्जन म्हणजे ज्या ज्या कारणांमुळे तुमची पचनशक्ती बिघडली आहे जी कारण आपण आता पाहिली ती कारणं बंद करणे हे पहिलं महत्त्वाचं पाऊल तरच कोणतीही समस्या मुळापासून कमी होते तुम्ही एकीकडे पचनशक्ती सुधारण्याचे उपाय कराल आणि दुसरीकडे दिवसभर बसून राहाल किंवा वाटेल ते खाल तर पचन शक्ती कशी सुधारणार
8:32 तात्पर्य काय तर आपण आत्ता कारणच यासाठी पाहिली की जीवनशैलीतून ती नेहमीसाठीच कमी करायला हवी म्हणून शक्यतो माझा भर कुठल्याही समस्यांमागची कारण तुम्हाला समजावून देण्याकडे असतो ती कारण आपण नीट समजावून घेतली त्यावर काही काम केलं तरच समस्या मुळापासून बऱ्या होतात आजकाल बरेचदा डॉक्टरांकडे एवढा वेळ नसतो की प्रत्येक वेळी तुम्हाला झालेल्या आजाराची कारणं किंवा त्यासाठी तुम्हाला जीवनशैलीत करण्याचे बारीक सारीक बदल हे प्रत्येक पेशंटशी बोलणे डॉक्टर्सना प्रॅक्टिकली शक्य होत नाही हेच काम आपण आपल्या चॅनल द्वारे करतोय आयुर्वेदाचे शास्त्रीय ज्ञान प्रामाणिकपणे अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवण्याचा आपल्या चॅनलचा उद्देश आहे म्हणूनच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा एक फार सुंदर श्लोक आहे
9:17 आयुर्वेदामध्ये तत्र अल्पे लंघन पथ्य मध्य दीपन पाचन प्रभूते शोधन म्हणजे काय तर जेव्हा अपचन किंवा या समस्या फार अल्पप्रमाणात आहेत नवीन आहेत नुकती सुरुवात झाली आहे किंवा तात्पुरत्यात तेव्हा सगळ्यात उत्तम उपचार म्हणजे लंघन हलका आहार घेणे किंवा पोटाला पूर्ण आराम देणे चवीसाठी किंवा सवय म्हणून खाणं हा मानवाचा एक स्वभावच आहे म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या निमित्तांनी उपवासाची योजना केलेली असते म्हणून पचनशक्ती सुधारण्यासाठी मध्ये असे शास्त्रशुद्ध उपवास करू शकता जेव्हा पचनशक्ती बरेच दिवसांपासून बंद आहे अशा वेळी लंघन करावं आणि त्याबरोबर काही औषध घ्यावी असं आयुर्वेद म्हणते पाचक औषध कोणती तर आपल्या मसाल्याच्या
10:02 डब्यातली बहुतांश औषध पचनशक्ती वाढवणारी आहेत जसं सुंठ लवंग दालचिनी ओवा जिरं बडीशोप यापैकी कुठलेही एक किंवा दोन औषध घ्यावी एक चमचा औषध दोन कप पाण्यात उकळून एक कप काढा करावा आणि सकाळी उपाशीपोटी हा काढा घ्यावा त्यामुळे शरीरात साचलेले दोष कमी होतात त्यांचं पचन होतं आणि अग्निदीपण व्हायला पचनशक्ती सुधारायला मदत होते अर्थात हा फारच बेसिक म्हणजे प्राथमिक उपाय प्रत्येकाला हाच लागू पडेल असं नाही त्यासाठी प्रकृती तपासून डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगलं आणि तिसरी लेव्हल जी आहे म्हणजे ज्यामध्ये खूप दिवसापासून वर्षानुवर्ष पचनशक्ती मंदावलेली आहे त्यामुळे काही आजार झाले आहेत तेव्हा शरीरशुद्धी हाच एक उपाय आहे तर ही शरीर
10:48 शुद्धी कशी करायची मुख्यतः पंचकर्म किंवा योग्य ती औषध घेऊन हा फक्त डॉक्टरांच्या अधिकारातला विषय असल्यामुळे त्याची चर्चा आपण इथे करणार नाही आता पाहूया शक्ती सुधारण्यासाठीचे पाच सोपे उपाय जे सगळेजण करू शकतात पहिला आहे एरंडेल तेल जर तुमची वाताची प्रकृती असेल म्हणजे त्वचा कोरडी आहे वय 50 च्या पुढे आहे आणि एकंदर पोटामध्ये वृक्षता म्हणजे कोरडेपणा खूप वाढला आहे खूप गॅसेस होतात अशा काही तक्रारी असतील तर तुमच्या आहारात योग्य त्या प्रमाणात स्निग्ध पदार्थ असायला हवेत आता वात वाढला असेल तर त्याचा उपचार आहे तेल आणि पचनाशी संबंधित काही तक्रारी असतील आणि पोटात कोरडेपणा असेल तेव्हा सगळ्यात उत्तम तेल आहे ते एरंडेल तेल पोट साफ व्हायला खूप वेळ लागत
11:35 असेल आणि खूप थोडी थोडी मलशुद्धी होत असेल तर आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा सकाळी उपाशीपोटी तुम्ही 20 ते 25 ml एरंडेल तेल घेऊ शकता एरंडेल तेलाचे गुण कोणते त्याची शास्त्रीय माहिती त्याचे उपयोग याविषयी एक व्हिडिओ आपण यापूर्वीच पाहिलेला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही पुन्हा एकदा हा व्हिडिओ नक्की पहा आपला दुसरा उपाय आहे तूप घरी बनवलेला शुद्ध तूप किंवा त्रिफळा इत्यादी औषधांनी सिद्ध केलेलं औषधी तूप हे तूप कधी उपयोगी पडेल तर पित्तदोष वाढलेला असेल तर म्हणजे हातापायांची जळजळ पोटात आग वारंवार आम्लपित्त अशी तक्रार असेल तर गृहत म्हणजे तूप घेतलं तर हा पित्तदोष कमी होतो कारण पित्ताचं सर्वश्रेष्ठ औषध आहे
12:21 गृहत घरी बनवलेलं साजूक तूप एक एक चमचा सकाळ संध्याकाळ तुम्ही गरम पाण्यातून घेऊ शकता यामुळे पचनशक्ती सुधारते अग्निदीपण होतं आणि पोट साफ व्हायला मदत होते आपण हे जे पहिले दोन उपाय पाहिले ना एरंडेल तेल आणि शुद्ध तूप यामुळे पचन संस्थेला आतून एक प्रकारचा स्निग्धपणा येतो म्हणजे लुब्रिकेशन होतं आणि आयुर्वेदात म्हटलंय एखाद्या भांड्याला तुम्ही आतून तेल तुपाचा हात लावलेला असेल तर त्याला जसं काही चिकटत नाही तसंच जर योग्य प्रमाणात योग्य वेळी तुम्ही योग्य तेल किंवा तूप घेतलं तर पचन संस्थेमध्ये दोष जमा होत नाही तिथून त्यांचा निचरा होत राहतो हो आता आपला तिसरा उपाय तो म्हणजे त्रिफळा चूर्ण फक्त पोट साफ करण्यासाठीच नाही तर पचनशक्ती
13:08 सुधारण्यासाठी इतर अनेक समस्यांसाठी उपयुक्त असलेलं त्रिफळा चूर्ण एक सुप्रसिद्ध औषध आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना याचा परिचय असेलच बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की त्रिफळा रोज घेतलं तर त्याची सवय लागेल का तर तुम्ही ते योग्य अनुपानाबरोबर घेणं खूप महत्त्वाचं आहे जर शरीरात कोरडेपणा असेल तर तुम्ही त्रिफळा चूर्ण गरम पाण्यात त्याबरोबर थोडं तेल तूप टाकून घ्यायला हवं म्हणजे कोरडेपणा आणखी वाढत नाही आता पुढचा चौथा उपाय आहे तो म्हणजे मनुका लहान मुलं आहेत स्त्रिया गर्भिणी किंवा वृद्ध व्यक्ती आहेत नाजूक व्यक्ती आहेत त्यांची पचनशक्ती मंदावली असेल तर मनुका हे सर्वोत्तम औषध कारण मनुका मृदू असतात स्निग्ध असतात आणि हळुवारपणे पचनशक्ती
13:55 सुधारणाऱ्या आहेत त्या रात्री स्वच्छ धुऊन भिजवाव्या आणि सकाळी उपाशी पोटी चावून खाव्यात जर पचनशक्ती फार मंदावली असेल तर त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे मनुकांचे सूप साधारण पंधरा ते 20 मनुका धुऊन घ्याव्या त्यामध्ये दोन कप पाणी घालून उकळून निम्म राहिल्यानंतर यामध्ये थोडसं सैंधव मीठ आणि तूप घालावं आणि हे पाणी गाळून घ्यावं त्यामध्येच या मनुका कुस्करून घालाव्या आणि हे सूप दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्यावं तुमच्या तक्रारी म्हणजे समस्या किती जुन्या आहेत त्यानुसार तुम्ही साधारण आठ पंधरा दिवस सलग रोज हे सूप घेतलं तर पचन शक्ती खूप सुधारते आता आपला पाचवा उपाय तो आहे योग्य व्यायाम तर कसाही व्यायाम अपेक्षित नाही यामध्ये तर विशेषतः पोटाचे व्यायाम अपेक्षित आहेत ज्यामुळे पचनशक्ती सुधारेल
14:42 अग्निदीपण होईल पाचन होईल असे व्यायाम कोणते तर सूर्यनमस्कार आहे पवन मुक्तासन वज्रासन क्रंचेस असे कुठलेही योग्य व्यायाम हे नियमितपणे केले तर पोटाचे स्नायू स्ट्रॉंग होतात पोटातल्या अवयवांचे काम सुधारतं ज्या ग्लँड्स आहेत त्यांचं सिक्रेशन उत्तम मदत होते असा योग्य आणि नियमित व्यायाम दीर्घकाळ केला तर पूर्ण आरोग्य सुधारतं योग्य व्यायाम केल्यामुळे जो मानसिक ताणतणाव आहे ज्यामुळे पचन बिघडलंय तोही मॅनेज व्हायला म्हणजे त्याचं व्यवस्थापन करायला फायदा होतो म्हणून सगळ्याच दृष्टींनी व्यायाम अत्यावश्यक आहे तर मंडळी हे झाले पाच सोपे उपाय काय काय पाहिलं आपण आज तर पचनशक्ती बिघडण्याची पाच महत्त्वाची कारण अध्यक्ष विषमासन भूक
15:28 नसताना व्यायामाचा अभाव आणि मानसिक कारण पचनशक्ती बिघडली आहे हे दर्शवणारी पाच महत्त्वाची लक्षणं कोणती मलावरोध अपचन पोट फुगणे आम्लपित्त आणि वेगवेगळे आजार आणि पचन सुधारण्यासाठी सर्वांना करता येतील असे पाच सोपे उपाय कोणते एरंडेल तेल शुद्ध तूप त्रिफळा चूर्ण मनुका आणि योग्य व्यायाम आशा आहे की सर्वांना ही माहिती आवडली असेल आणि त्याहून जास्त म्हणजे या माहितीचा दैनंदिन जीवनात तुम्हाला नक्की उपयोग होईल असा मला विश्वास आहे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु धन्यवाद [संगीत]